सौजन्य:- YouTube |
Ashadi Ekadashi Rangoli Designs| आषाढी एकादशीला काढा सुंदर श्री विठ्ठल रांगोळी डिझाईन्स
Ashadi Ekadashi Rangoli
आपल्या घराबाहेर छान रांगोळी काढून, विठूरायाची मनोभावे पूजाअर्चा करून, घरात गोडाधोडाचे जेवण करून हा सण साजरा करतील.
आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.