Swadhar Yojana 2024 Marathi । स्वाधार योजना 2024 मराठी
या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवेश मिळवलेल्या संस्थांच्या क्षेत्रांप्रमाणे अनुदानाची धनराशी निश्चित केल्या गेली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वार्षिक 51,000/- रुपये आर्थिक मदत दिली जाते.
महाराष्ट्र स्वाधार योजना 2024 key Highlights
योजनेचे नाव | स्वाधार योजना महाराष्ट्र |
---|---|
योजनेची सुरुवात | 2016 ते 2017 |
द्वारा सुरु | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नवबौद्ध प्रवर्गातिल विद्यार्थी |
उद्देश्य | शिक्षणासाठी आर्थिक अनुदान |
आधिकारिक वेबसाइट |
https://sjsa.maharashtra.gov.in |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र |
महाराष्ट्र स्वाधार योजना अंतर्गत मिळणारे लाभ
महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी, 12वी पदवी, पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि ज्यांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही, अशा पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता व निवासाची सोय आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे अनुदानाची रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.
मिळणारा भत्ता | मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या सारख्या क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम | इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित ”क” वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम | उर्वरित क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम |
---|---|---|---|
भोजन भत्ता | 32,000/- रुपये | 28,000/- रुपये | 25,000/- रुपये |
निवास भत्ता | 20,000/- रुपये | 15,000/- रुपये | 12,000/- रुपये |
निर्वाह भत्ता | 8,000/- रुपये | 8,000/- रुपये | 6,000/- रुपये |
असा एकूण भत्ता | 60,000/- रुपये | 51,000/- रुपये | 43,000/- रुपये |
वरील अनुदानाच्या धनराशी व्यतिरिक्त वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपये आणि अन्य अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2,000/- रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.
स्वाधार योजना 2024 लाभार्थी पात्रता
महाराष्ट्र राज्यातील ज्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना स्वाधार योजने अंतर्गत लाभ मिळवायचा आहे त्यांना या योजनेमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे, या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लाभार्थी पात्रता निकष खालीलप्रमाणे राहील.
- या योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचा असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांनी जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
- विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी ज्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा शेड्यूल बँकेत खाते उघडले आहे, त्या खात्याशी स्वतःचा आधार क्रमांक संलग्न करणे बंधनकारक असेल.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वर्षी एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
- या योजने अंतर्गत विद्यार्थी स्थानिक नसावा, म्हणजे विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा.
- स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थी इयत्ता 11वी किंवा 12वी आणि त्यानंतरचे दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमांसाठी उच्च शिक्षण घेणारा असावा.
- स्वाधार योजनेमध्ये इयत्ता 11वी आणि 12वी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी मध्ये किमान 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.
- या योजनेच्या अंतर्गत दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन / CGPA चे गुण असणे आवश्यक आहे. स्वाधार योजनेच्या अंतर्गत इयत्ता 12वी नंतर पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा त्याचप्रमाणे पदवीनंतर पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाचा कालावधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
- स्वाधार योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी राज्य शासन, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद, वैद्यकीय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्र शिक्षण परिषद किंवा तत्सम सक्षम प्रधीकारी यांच्या मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये आणि मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2024
- योजनेंतर्गत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे खालीलप्रमाणे असतील
- अधिकृत जातीचे प्रमाणपत्र
- महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र ( अधिवास प्रमाणपत्र / रेशनकार्ड / निवडणूक ओळखपत्र / जन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही)
- आधार कार्डाची प्रत
- बँकेत खाते उघडले याचा पुरावा म्हणून बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत
- तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा वडील नोकरीत असल्यास फॉर्म नंबर 16
- विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्या बाबतचे प्रमाणपत्र
- इयत्ता 10वी, 12वी किंवा पदवी परीक्षेचे गुणपत्रिका
- महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
- विद्यार्थिनी विवाहित असल्यास पतीच्या उत्पन्नाचा दाखला.
- बँकखाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबतचा पुरावा
- विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र
- स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
- वर्तमान रहिवासी पत्ता पुरावा
- महाविद्यालायचे उपस्थितीचे प्रमाणपत्र
- सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत
महाराष्ट्र स्वाधार योजना 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- स्वाधार योजना अंतर्गत ज्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये अर्ज करायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे प्रक्रियेच अनुसरण करावे.
- सर्वप्रथम अर्जदार विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, या नंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल.
- या होम पेजवर तुम्हाला ‘’स्वाधार योजना PDF’’ हा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल, यानंतर तुम्हाला स्वाधार योजनेच्या अर्जाचा PDF डाऊनलोड करून घ्यावा लागेल.
- त्यानंतर योजनेचा फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर, स्वाधार योजनेच्या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल, तसेच या योजनेला आवश्यक असलेली वरील प्रमाणे संपूर्ण कागदपत्रे जोडून संबंधित समाज कल्याण कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल.
- याप्रमाणे प्रक्रियेचे अनुसरण करून तुमची, स्वाधार योजना 2024 योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
- अधिकृत वेबसाईट :– इथे क्लिक करा
- स्वाधार योजना माहिती PDF :– इथे क्लिक करा
- स्वाधार योजना फॉर्म PDF :– डाऊनलोड